जागतीक दिव्यांगदिनाचे औचित्य साधून दिव्यांगांच्या विविध प्रलंंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात ३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दिव्यांग बांधवांचे विशाल धरणे आंदोलन राबविण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

  या आंदोलनाला जेष्ठ पदाधिकारी वंदना अक्कर, बेबी कोरडे, गोपाल मोटे, यमुना बेलखेडे, दिलीप सातव, परशराम दंडे, रमेश चव्हाण, मनोज इंगळे, धनीराम बाजड, विठ्ठल राठोड, संजय अबलकर, योगीराज लाडवीकर, गजानन कुटे, मैनुद्दीन काझी, प्रतिक कांबळे, गणेश इंगोले, महेश देशपांडे, संतोष वैरागडे, बाळू वानखेडे, दिपक काशीद, गजानन बिहाडे, मंगेश गायकवाड, राजाराम गायकवाड, सुरेश थोरात, अनिल पंडीतकर, आशा भालेराव, मुस्कान गुलाम खा, शकील खान, राधा आठवले, राजाराम राऊत, प्रवीण सदाटे, रेखा बेंद्रे, बबन करड, गुलाब राठोड, राजेश हिवराळे, बंडू कांबळे, घुगे, लक्ष्मण राऊत, कमल गायकवाड, सुरेश बोडके, शांताबाई राठोड, पांडुरंग राऊत, अंतकलाबाई काळे, काशीराम भिसे, पुष्पा सुर्वे, समीनाबी लोकमान शाह, तारासिंग राठोड, राधेश्याम जाधव, संजय बेंद्रे, कल्पना कड, विजय सावके, दिलीप धनगरे, दिलीप कव्हर, दिलीप भगत, तायडे, सुरेश सुर्वे, पुष्पा सुर्वे, कडूबा गुडदे, गजानन गुडदे, कृष्णा कोल्हे, सचिन दोडके, जयश्री कांबळे, महादेव नाईकवाडे, दौलतराव अंभोरे, बेबीताई बोबडे, उज्वला कवर आदींसह जिल्हयातील दिव्यांग बंधुभगिनींनी बहूसंख्येने सहभाग घेतला यावेळी रा.अ.वि.महासंघाने पाठींबा दिला.पोलीस विभागाणे चोख बंदोबस्त दिला होता.