रत्नागिरी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी याना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्ते संदर्भात नोटीस पाठवली आहे. रायगड लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या चौकशी संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. 5 डिसेंबर रोजी मालमत्ता चौकशीसाठी सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश या नोटीसीमधून देण्यात आले आहेत.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
वैभव नाईक यांचीही चौकशी सुरू
आमदार साळवी यांच्यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनाही बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात नोटीस देण्यात आली आहे. ऐन दिवळीत देण्यात आलेल्या नोटिसीमुळे राज्याचं राजकारण चांगलचं तापलं होतं. त्यांच्याविरोधातील या प्रकरणात सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू आहे.
कोकणातून शिवसेनेच्या ९ आमदारांपैकी केवळ ३ आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. बाकी सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांमध्ये आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी आणि आमदार भास्कर जाधव यांचा समावेश आहे. यातील वैभव नाईक आणि राजन साळवी चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.
राजन साळवी शिंदे गटात जाण्याच्या चर्चा
काही दिवसांपासून आमदार राजन साळवी शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार साळवी अनुकूल आहेत तर खासदार विनायक राऊत कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. याच मुद्दयावरून कोकणातील सातवा आमदारही शिंदे गटात जाण्याच्या चर्चांनी वेग घेतला होता. याबाबत भेटीगाठीही पार पडल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र अशात राजन साळवी यांना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस देण्यात आली आहे.