रत्नागिरी , मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

  समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांच्या मनात एड्स हा संसर्गजन्य रोग नसून तो वैयक्तिक आजार आहे. त्यामुळे एचआयव्ही बाधित व्यक्तीला दुर्लक्षित न करता सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे आपण वागणूक देऊन मानसिक आधार देऊन जगण्याचे बळ देऊ शकतो हा संदेश पथनाट्यद्वारे शिरिष मुरारी मयेकर माध्यमिक विद्यालय व सुनील मुरारी मयेकर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रेक्षकांना देण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पल्लवी गावडे, चैताली गावडे, अमित घाणेकर, राहुल रेवाळे, दर्शन खापरे, दक्षता खापरे, साहिल वीर, चिन्मय इंदुलकर हे सहभागी होते.

 या कार्यक्रमाला मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा पालये आणि राष्ट्रीय सेवा विभाग प्रमुख प्रा. अवनी नागले यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा.तेजश्री रेवाळे, सहाय्यक शिक्षक श्वेता पवार, सर्व सहकारी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.