कोकण दौऱ्याच्या निमित्ताने राजापुरात आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रिफायनरी प्रकल्प समर्थक व विरोधक अशा दोन्ही संघटनांनी भेट घेत निवेदन सादर केले. ठाकरे यांनी यापूर्वीच रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ भूमिका जाहीर केली आहे. मात्र राजापुरात दोन्ही संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी रिफायनरीबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचे टाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शनिवारी राज ठाकरे यांचे सिंधुदुर्गातून राजापुरात आगमन झाले. राजापुरातील तालुका संपर्क कार्यालयाचा शुभारंभ केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या ठिकाणी रिफायनरी समर्थक व विरोधकांनी त्यांची भेट घेत आपापली निवेदने सादर केली. बारसू सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाला मोठे समर्थन असून तालुक्यातील अनेक संघटना, ग्रामपंचायतींनी प्रकल्प समर्थनार्थ ठराव केले आहेत. तालुक्यातील बेरोजगारी, आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा अभाव यात बदल रिफायनरी घडवण्यासाठी समर्थकांनी केली. प्रकल्प होण्याची आग्रही मागणी केली.

बारसू - सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा ग्रामसभांचे ठरावही तीव्र विरोध असून सर्व रिफायनरी विरोधात आहेत. कोकणासारख्या निसर्गसंपन्न प्रदेशात रिफायनरी, पेट्रोकेमिकल आदी रासायनिक गटार करणारे प्रकल्प न आणता शाश्वत विकासाचे पर्यावरणपूरक प्रकल्प स्थानिक यावेत, ही बहुसंख्य कोकणवासीयांची इच्छा आहे. त्यामुळे रिफायनरीविरोधी भूमिका घेऊन ती रद्द होण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मनसेने नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनीही सागवे येथे बैठक घेत स्थानिक प्रकल्पविरोधकांची साथ दिली होती. तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनीही या प्रकल्पाविरोधात सातत्याने आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर भाजपा वगळता अन्य सर्व पक्षांनी प्रकल्पविरोधी भूमिका घेतल्याने नाणार येथील प्रकल्प रद्द झाला होता. सद्यस्थितीत रिफायनरी प्रकल्प बारसू - सोलगाव परिसरात हलविण्याच्या हालचाली सुरू असून बहुतांश पक्षांनी या प्रकल्पाला समर्थन दिल्याचे दिसत आहे.

मधल्या काळात राज ठाकरे यांनीही रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती ती अद्यापही तशीच असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे रत्नागिरी दौऱ्यात राज ठाकरे अपेक्षा व्यक्त करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.