रत्नागिरी तालुक्यातील त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्यातर्फे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवार दिनांक 6 डिसेंबर रोजी 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन शिवाजीनगर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

महापरिनिर्वाण दिन हा सर्व भारतीयांसाठी दुःखाचा असून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या अभिवादन कार्यक्रमासाठी प्रवचनकार, धम्ममित्र संतोष गमरे उपस्थित राहून "डॉ बाबासाहेब आंबेडकरांची महानता" या विषयावर अनमोल विचार व्यक्त करणार आहेत. तरी संविधानवादी, आंबेडकरवादी सर्वांनीच कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.