शिरुर: आतापर्यंत तुम्ही बहीनीला, आईला, मुलाला, भावाला, किडणी दिल्याचे ऐकले असेल. परंतू चक्क आपल्या शिक्षक पत्नीला एका शिक्षकाने आपली किडणी देवून पत्नीधर्म निभावून पत्नीच्या प्रेमापोटी जीव वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. परंतू नियती पुढे कोणाचेही काही चालत नाही. किडणी देवूनही पत्नीचे दुखःद निधन झाल्याने शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

करडे (ता. शिरुर) येथील रहिवाशी व कारेगाव येथिल शिक्षिका चंदाराणी शिवाजीराव वाळके यांचे वयाच्या ५२ वर्षी आजाराने दुखद निधन झाले आहे. दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्या आजाराने ग्रस्त होत्या .त्यांचे पती शिवाजीराव वाळके हे शिक्षक संघटनेत पदाधिकारी असून त्यांनी अनेक वर्ष पत्नीच्या आजारासाठी डॉक्टरकडे शर्थीचे प्रयत्न केले.

परंतु पत्नी च्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने आजार आटोक्यात येइना शेवटी आजार आटोक्यात न आल्याने त्यांनी स्वतः ची किडनी पत्नी साठी द्यायचे ठरवले. डॉक्टर यांच्याशी चर्चा केल्यानंतर १९ जुलै २०२२या तारखेला शस्रक्रिया यशस्वी झाली. पत्नीचे प्राण वाचवून स्वतः ची किडनी देवून त्यांनी पत्निधर्म निभवला. समाजासमोर आदर्श ठेवून एकमेव आदर्श पती चे उदाहरण म्हणून समाजासमोर आहे.

थोड्या काळात हे दांपत्य सुखी जीवन जगत असताना नियातीला हे पसंत नसल्याने अचानक पत्नीची प्राणज्योत मालवली. पती शिवाजीराव वाळके यांनी पत्नी ला एक किडनी देवून समाजासमोर मोठा आदर्श ठेवला. परंतु (दि. ३०) नोव्हेबर रोजी पत्नीचे निधन झाले. या वाइट घटनेने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्व शिक्षकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यांच्या पश्चात एक मुलगा व भाऊ आहे.