बीड- भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही किंवा व्यक्तिकेंद्रितपणा नसून विचारधारेच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. लोकशाहीला अभिप्रेत असणारे लोकहिताचे समाजकारण व राजकारण करणारा देशातील एकमेव पक्ष आहे. देशाची चिंता आणि विकास समोर ठेऊन मा. नरेंद्र मोदी देश चालवतात. समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध योजना मोदी सरकार राबवत असल्यामुळे सर्वांचाच सर्वांगीण विकास चालू आहे. तत्कालीन पालकमंत्री लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी कोणताही भेदाभेद न ठेवता विकासाचे नवे पर्व जिल्ह्यात निर्माण केल. अडगळीत पडलेला विकास जनतेसमोर आणला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहचवली. सत्तेचा दुरुपयोग केला नाही. सातत्याने विकासाचे राजकारण करून, गोरगरीब आणि वंचितांना न्याय दिला. भारतीय जनता पार्टीचे विकासाचे राजकारण चालू असल्यामुळेच आज सर्व घटकातील जनतेचे भाजपाला समर्थन मिळत आहे. असे विचार भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी लिंबागणेश येथील युवकांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी व्यक्त केले.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आज लिंबागणेश जिल्हापरिषद गटातील लिंबागणेश येथील युवा कार्यकर्ते अंकुश गायकवाड व त्यांचे सहकारी प्रेम गायकवाड, राहुल गायकवाड, अश्रुबा गायकवाड, सुरज गायकवाड, विकास गायकवाड, शिवराम गायकवाड, विनोद पवार, सचिन पवार, देविदास पवार, बंटी निर्मळ, बाबू आबदार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रवेश केला. राजेंद्र मस्के यांनी लिंबागणेश सर्कलमधील भरीव विकासाची कामे केली. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या परिसरातील गोरगरीब जनतेला मदत केली. जनसंपर्क आणि विकास कामांचा धडाका यामुळे या सर्कलमधील राजेंद्र मस्के यांची लोकप्रियता वाढली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत फड, शांतीनाथ डोरले. सरपंच अश्विन शेळके, सरपंच आकाश शेळके, उद्धव जाधव, महावीर जाधव, सरपंच वसंत गुंदेकर, सरपंच रामा बांड, सरपंच बाबुराव कदम, माजी सरपंच महादेव बहीरवाळ, ग्रा.प.सदस्य. विशाल पाखरे, ग्रा.प.सदस्य दिलीप डोंगर, सुग्रीव डोके, रवींद्र कळसाने, शंकर तुपे, संजय काळे, शाम राऊत, हरीश खाडे, संभाजी सुर्वे, बद्रीनाथ जटाळ, महेश सावंत, सुरेश मोरे, अरुण कदम, सुनील तुपे, शिवाजी तुपे, कल्याण पवार, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.