कु.श्रावणी काकडे हिने बीड नगरीचे नाव उज्वल केले - मा.नगराध्यक्ष

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या कडून कु.श्रावणी काकडे चे अभिनंदन

बीड दि.04 - जंप रोप फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने कर्नाटक राज्यातील होस्पेट येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या बीडच्या कु.श्रावणी श्रीराम काकडे या खेळाडूने 01 सुवर्णपदक व 01 कांस्यपदक पटकावत दमदार कामगिरी केली आहे.

 बीड नगरीचे मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी कु.श्रावणी श्रीराम काकडे हीचे अभिनंदन केले व प्रोत्साहनपर एक ट्रॅक सुट देखील भेट देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मा.नगराध्यक्षांनी कु.श्रावणी हिने पदक पटकावत बीड नगरीचे तसेच जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात तिला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

 कर्नाटक येथे 28 जुलै ते 31 जुलै दरम्यान सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातून विविध राज्यातील 15 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र संघात श्रावणी काकडे हीचा सहभाग होता. स्पीड व डबल अंडर रीले स्पर्धेत श्रावणीच्या संघाने सर्व संघाला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

 यावेळी मा.नगरसेवक गणेश वाघमारे, अ‍ॅड.विकास जोगदंड, श्रीराम काकडे, अविनाश उबाळे, कपिल सोनवणे, अविनाश कांबळे, अक्षय तरकसे, विशाल सोनवणे, बापू झांबरे, नितीन काकडे आदी उपस्थित होते.