रांजणगाव गणपती: पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल चौतीस जणांची पोलीस नाईक पदाहून पोलीस हवालदार पदावर बढती झालेली आहे. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार संजीव दाजीराम गायकवाड आणि गुलाब शिवराम येळे यांची सहायक फौजदारपदी बढती झाली. तर पोलिस नाईक म्हणुन कार्यरत असलेले माणिक बबनराव काळकुटे, अभिमान बाजीराव कोळेकर व तेजस लक्ष्मण रासकर या तिघांची पोलिस हवालदारपदी बढती झाली आहे.
या सर्वांचे रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, शुभांगी कुटे, यांनी अभिनंदन केले. यावेळी सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, मारुती पासलकर, पोलिस हवालदार विजय सरजिने, आप्पासाहेब सूर्यवंशी, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, सुरज वळेकर, उमेश कुतवळ, महिला पोलिस कॉन्स्टेबल रुपाली हजारे, मनिषा घुले, मोनिका वाघमारे, पोलिस नाईक राजेंद्र ढगे आदी कर्मचारी हजर होते.
माणिक काळकुटे देशसेवा करुन पुन्हा पोलिस दलात रुजू
शिरुर तालुक्यातील कासारी गावचे माणिक बबनराव कळकुटे हे सन 1988 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते. 18 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर सन 2006 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर सन 2007 साली ते पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती झाले. त्यांनी पोलिस दलात 16 वर्ष नोकरी केली असुन पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस नाईक आणि आता पोलिस नाईक पदावरुन त्यांची पोलिस हवालदारपदी बढती झाली आहे.