मुंबई: दररोज मोठ्या प्रमाणात इंधनाचे दर वाढतायेत. त्यामुळे सर्वसांमान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. मात्र केंद्र सरकारकडून सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मोदी सरकार लवकरच गॅसचे दर कमी करण्यासाठी विशेष योजना आखत आहे. यामुळे लवकरच घरगुती गॅस-सीएनजी स्वस्त होऊ शकत. सध्या वेगाने दररोज सीएनजी आणि एलपीजीच्या दरात मोठी दरवाढ पहायला मिळतेय. सरकारचा नक्की प्लॅन काय आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गॅसच्या किंमतीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून गॅस दराच समीक्षा केली जाते. या समितीकडून प्लानिंग केली जात आहे. त्यानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या ओल्ड फिल्डमधून येणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ठरवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारच्या या निर्णयामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट पहायला मिळू शकते. योजना आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारेख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करतेय. हे काम अंतिम टप्प्यात आहे. समितीकडून लवकरच सरकारसमोर अहवाल सादर केला जाणार आहे. 

संबधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समिती 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्य निर्धारण व्यवस्थेला प्रोत्साहन देऊ शकते. सोबतच ओएनजीसी आणि ऑईल इंडिया लिमिटेडच्या फिल्डमधून येणाऱ्या गॅसची किंमती ठरवण्याबाबतही चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.