पुणे महानगरपालिकेच्या वडगाव क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वाघोली मधील प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करत तब्बल एक लाख 53 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे प्लास्टिक वापरण्यावरती आणि विक्रीकरणावरती प्रशासनाच्या वतीने बंदी घालण्यात आलेली आहे, असे असताना देखील वाघोली मधील दुकानांमध्ये सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे याबाबत वेळोवेळी कारवाई करून देखील प्लास्टिक विक्री व वापरणाऱ्या दुकान दारांमध्ये सुधारणा होत नसल्याने पुणे महानगरपालिकेच्या वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पथकाने वाघोली मध्ये मोठी कारवाई करत दुकानातील प्लास्टिक जप्त करत त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे यावेळी प्रकाश ट्रेडर्स व आर्यन प्लास्टिक यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड तर राधे ट्रेडर्स याला पंचवीस हजार रुपये दंड, व इतर काही दुकानदाराकडून असा तब्बल एक लाख 53 हजार रुपये शुल्क वसूल केले आहेत ही कारवाई पुणे महानगरपालिकेचे वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक उपायुक्त सोमनाथ बनकर,सुषमा मुंढे,श्रीपाद महाजन,अजय थोरात यांच्या पथकाने केली