मुंबई: दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटात मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरुने तिच्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर ती पुन्हा एकदा आगामी ‘छुमंतर’ चित्रपट घेऊन येत आहे. रिंकूची ‘सैराट’ चित्रपटांतील आर्चीची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.
सैराटनंतर रिंकू ‘कागर’, ‘मेकअप’ आणि ‘आठवा रंग प्रेमाचा’ यासारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या. रिंकू सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. सध्या आर्ची म्हणजे, रिंकूच्या एका व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरुने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पर्पल रंगाचा टॉप आणि पीच रंगाचा स्कर्टमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिच्या पर्पल रंगाचा टॉपने चारचॉंद लावले आहेत. यावेळी रिंकूने फॅशन करताना दोन वेगवेगळे रंग निवडले असून यात तिचा प्रिंटेट स्कर्टदेखील आकर्षक दिसत होता. रिंकूच्या अनोख्या फॅशनने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने जांभळ्या आणि रेड रंगाचे दोन इमोजी शेअर केली आहेत. या फोटोला तिने सोफ्यावर बसून, उभारून आणि गालावर हात ठेवत हटके पोझ दिली आहे. केसांची स्टाईल, गालावर केसांची बट, लिपस्टिक आणि इअररिंग्सने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.