पाटोदा (प्रतिनिधी) बजरंग काकडे वय ४० यांचे हुले कन्ट्रक्शन वानेवाडी वांजराफाटा येथे दि २३/११/२०२२ रोजी सायं ५.०० वा.घातपाती संशयास्पद मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचे म्हणणे आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटोदा तालुक्यातील बजरंग काकडे हे रा. धनगरजवळका ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवासी असुन हे हुले कन्ट्रक्शन सबस्टेशन ऑपरेटर पदावर काम करत होते. त्यांचा मृत्यू दिनांक २३/११/२०२२

रोजी झाला असून हा मृत्यू संशयास्पद हत्या आहे असे काकडे परिवार व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे. तरी संशयास्पद व्यक्तीवार गुन्हा दाखल करण्यात यावा व काकडे परिवार व ग्रामस्थ यांना न्याय देण्यात यावा म्हणून पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये घोषणाबाजी करण्यात आली व पाटोदा तहसीलदार यांना निवेदन देऊन

ही मागणी करण्यात आली जो पर्यंत संशायस्पद व्यक्तीवर कार्यवाही करण्यात येत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही तात्काळ कार्यावाही करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करु असा इशाराही निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला आहे

पाटोदा तालुक्यात चोऱ्या व गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्यामुळे पाटोदा पोलिस स्टेशनला कायस्वरूपी पोलीस निरीक्षक दयावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी केली आहे