आज दिनांक 22/11/2022 पासून अमरण उपोषण कोर्टाच्या कंपाऊंड वॉल च्या बोगस कामामुळे गुत्तेदार सुनील अग्रवाल उर्फ पापासेठ यांनी एक वर्षापूर्वी काम पूर्ण केले आहे कंपाऊंडवॉल च्या खालील बाजूस भराव न केल्यामुळे कोर्टाच्या आवारातील साचलेले सर्व पाणी दिव्यांग अर्जदार अंकुश बापूराव खालापुरे परतूर यांच्या कापसाच्या शेतामध्ये तीन फूट पाणी साचल्यामुळे सर्व पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुर्णत: हा दीव्यांग असल्यामुळे त्याची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे सदरील अर्जदार हा ओक्सिजन वर आहे करिता गुत्तेदार याने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्याण्यात यावी या साठी अमरण उपोषण चालू आहे. अशी मागणी उपोषणकर्ते: अंकुश बापूराव खालापुरे व दत्ता गणेशराव खालापूरे यांच्या द्वारे करण्यात आले आहे. इ उपोषणास बसलेले . सदर उपोषण कर्त्याचे बरे वाईट झाल्यास संबंधित जबादारी बांधकाम विभाग यांची असेल असे निवेदाद्वारे करण्यात आले आहे.
परतूर नवीन कोर्ट इमारतीच्या संरक्षण भिंतीचे बोगस कामामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे पाण्यामुळे नुकसान त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषन .
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/11/nerity_d6931e2ffe1a56f8512d7be0e11dbd01.jpg)