मुंबई:- २१ नो.(दीपक परेराव ) महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या सूचनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवत मान्यता दिली. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उच्चाधिकारी बैठकीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान व गृहमंत्री यांची भेट घ्यावी. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असताना यासाठी राज्यातील दोन मंत्र्यांची समनव्यक म्हणून नेमणूक करावी. तसेच सीमा भागातील ८६५ गावांना बंद झालेले मुख्यमंत्री धर्मदाय योजनेतून मिळणारे लाभ पुन्हा सुरू करावे, अशा विनंतीवजा सूचना केल्या, त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत तात्काळ मागण्या मान्य केल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समितीचे सदस्य मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, डॉ. तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.