शिरुर: शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परीसरात अवैध्यरीत्या मुरुम उपसा, वाळू उपसा सुरु असून मंडल आधिकाऱ्यांच्या संगणमताने हे प्रकार सुरु असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे त्याचे कारण ही तसेच आहे. हे मंडल आधिकारी याच भागातील कवठे येमाईचे रहिवाशी असून त्यांचे अनेक वर्षापासून या माफीयांशी घनिष्ठ सबंध आहे. त्यामुळे या भागात डोंगरगण, शिनगरवाडी, टाकळी हाजी या ठिकाणी राजरोसपणे अवैध्य गौण खनिज उपसा व वाहतुक सुरु आहे. तसेच अनेक प्रकारच्या नोंदी प्रमाणित करण्यासाठीही हे महाशय नागरीकांकडून भरमसाठ पैश्याची मागणी करत असल्याचे म्हसे येथील काळूराम पवार यांनी "शिरुर तालुका डॉट कॉम" शी बोलताना सांगितले.
"शिरुर तालुका डॉट कॉम" च्या बातमीने तात्काळ तलाठी शकील कमलीवाले व ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांनी तात्काळ पंचनामे सुरु केले असून बडया माफियांवर खरच कारवाई होणार का? की मंडल आधिकारी त्यांना त्यांचे मीठ खाल्ल्यामुळे कसे वाचवणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. मुळातच मुळ गावातील भागात मंडल आधिकाऱ्यांची नियुक्ती देणे चुकीचे असून ओळखीचा फायदा घेत राजरोसपणे विविध कामांमध्ये पैश्याची मागणी होत असून यातून मोठा भ्रष्ट्राचार बोकाळत चालला आहे. या प्रकरणाकडे तहसिलदार, ऊप विभागीय आधिकारी काय भुमिका घेतात याकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.
(क्रमशः)