मा.राहुलजी गांधी यांनी सुरू केलेल्या कन्याकुमारी ते जम्मु काश्मीर अशी 3500 किलोमीटर ची भारत जोडो यात्रा आता लोकांच्या प्रश्नांची चळवळ बनली आहे.1500 किमी चे अंतर पार करून महाराष्ट्र राज्यात दाखल झाली आहे.सदरील यात्रा नांदेड ,हिंगोली, वाशिम,अकोला बुलढाणा अशी प्रवास करत आहे.त्या पार्श्भूमीवर वाशिम जिल्हा युवक काँग्रेसची जबाबदारी असलेले बीड जिल्हातील शिरूर तालुक्यातील तिंतरवनी गावचे रहिवासी असलेले युवक काँग्रेस प्रदेश सचिव तथा वाशिम जिल्हा प्रभारी सुनील नागरगोजे यांनी या प्रवास दरम्यान राहुल गांधी जी यांच्या सोबत संवाद साधला असता राहुलजी यांनी क्या उम्मीद हैं मुझसे असा प्रश्न केला असता, सुनील नागरगोजे यांनी देश वासियांना गांधीचा देश परत मिळवून देण्याची इच्छा आपल्याकडून असल्याचे सांगितले. यावर त्वरित राहुल गांधी यांनी ही पदयात्रा या त्यासाठी असल्याचे सांगितले आहे. पदयात्रा दरम्यान राहुलजी चालत नसून,विविध घटकांचे प्रश्न प्रत्यक्ष भेटून ऐकून घेत असून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. या यात्रा दरम्यान वाशिम जिल्ह्या काँग्रेस अध्यक्ष तथा रिसोड मालेगाव मतदार संघाचे आमदार अमित जी झनक यांच्या नेतृत्वखाली असेलमेडशी वाशिम येथील सभेत प्रदेश सचिव सुनील नागरगोजे प्रदेश सचिव सचिन इप्पर बाबुराव शिंदे यांनी राहुलजी याना भाविकांचे श्रद्धास्थान पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती भेट दिली.राहुलजी याना भेटून मनस्वी खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सदरील यात्रेत मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग ज्येष्ठ वर्ग व महिलाचा लक्षणीय सहभाग असून सर्व सामान्य जनतेला राहुलजी न्याय देऊ शकतात. अशी भावना निर्माण झालेली आहे.देशात वाढत चाललेली बेरोजगारी महागाई,शेतकऱ्याचा प्रश्नांना फक्त राहुलजी हा च पर्याय म्हणून जनतेची मोठी आशा लागलेली आहे.वाशिम मालेगाव यात्रा दरम्यान जिल्हा परिषद सदस्य श्री वैभव भाऊ सरनाईक आणि कृष्णा सरनाईक व व्याड येथील नागरिक इतर सर्व नागरिक यात्रे मद्ये सहभागी झाले होते.