बीड शहरामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने चालू असलेल्या स्वच्छता मोहिमे मध्ये निदर्शनास आले की बीड शहराच्या मध्यभागी असणारा बुंदेलपुरा जुनी भाजी मंडई या भागामध्ये घाणीचे साम्राज्य मोकाट जनावरे मोकाट कुत्रे बंद पडलेल्या नाल्या या गोष्टीमुळे येथील सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे येथील घाणीच्या साम्राज्यामुळे काही नागरिकांना स्वतःचे घर देखील सोडून जावे लागले आहे येथील नागरिक गेल्या नगरपालिका निवडणुकांच्या अगोदर ज्या रस्त्याचे उद्घाटन केले होते त्या रस्त्यावरती खडी वाळू येऊन पडली परंतु तो रस्ता कधीच झाला नाही येथे लोकनेते सो केशर काकू शिरसागर माजी खासदार या नावाने कामगार भवन बनवण्यात आलेले आहे या ठिकाणी कामगार आसपासच्या खेड्यातून शहरातून स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी काम शोधण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि इथून काहीतरी काम मिळेल आपल्या घरची चूल जळेल या अशाने येतात परंतु या ठिकाणी नगरपालिकेचे एकही सोचालय एकही मुत्री घर नसल्यामुळे येथील मोल मजूर राहणारे येणारे जाणारे उघड्यावर तीच लघुशंका करतात तेथेच लहान मुले राहतात महिला असतात या सर्व सामान्य माणसांना हा त्रास सहन करावा लागत आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीने गेल्यावर्षी निवेदन दिले होते परंतु त्याकडे नगरपालिकेने कसलेही लक्ष दिलेले नाही म्हणून आम आदमी पार्टी येथून चोरी गेलेला रस्ता येथे पसरलेलं घाणीचे साम्राज्य हे सर्व प्रश्न घेऊन उद्या माननीय मुख्य अधिकारी नगरपरिषद बीड यांची भेट घेणार आहे जर भेट घेऊन काम झाले नाही तर आम आदमी पार्टी येथील सर्व नागरिकांना सोबत घेऊन एक मोठे जन आंदोलन उभा करेल या स्वच्छता मोहिमेमध्ये आम आदमी पार्टी शहरातील सर्व प्रश्न उचलत आहे व नागरिकांना जागरूक करण्याचे काम करत आहे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री उपाध्यक्ष अक्रम शेख रामधन जमले सचिव शहर अध्यक्ष सय्यद सादेक कैलास चंद पालीवाल कोषाध्यक्ष तालुका अध्यक्ष भिमराव कुठे मिलिंद पाळणे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते