बीड तालुक्यातील मौजे च-हाटा येथील ५ कोटी रूपये किंमतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र ट्रान्सफाॅर्मर अभावी केवळ शोभेची वस्तु बनले असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे आरोग्य केंद्र असुन अडचण आणि नसुन खोळंबा अशी अवस्था झाल्यामुळे अखेर आज दिनांक.२० नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थांसह च-हाटा बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात मनोज तांदळे ग्रामपंचायत सदस्य, सुशील उबाळे, बापु जाधव,सुदाम तांदळे,संदिप उबाळे,बलभीम उबाळे,सुभाष बांगर,योगेश तांदळे,प्रकाश ससाणे,चंद्रकांत नागरगोजे,राजेंद्र वळेकर,अमोल शिंदे,दिपक टाकसाळ,शिवाजी डफाळ,,ब्रम्हदेव शेळके,मनोज पवार आदि सहभागी झाले होते. निवेदन महावितरणचे सहाय्यक अभियंता भोईर,सहाय्यक अभियंता चव्हाण,लाईनमन वाघमारे,पीएसआय शेख,पोहे. राऊत,गायकवाड ,मंडळ आधिकारी इंगोले यांना देण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अंदाजे ५ कोटी रूपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र व आधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या ईमारती केवळ ठेकेदाराने ट्रान्सफाॅर्मर न बसवल्यामुळे विद्युत पुरवठा अभावी शोभेची वस्तु बनल्या असून विद्युत पुरवठा नसल्यामुळेच आधिकारी-कर्मचारी मुख्यालयी रहात नसुन कुठल्याही प्रकारच्या आंतररुग्ण तसेच शस्त्रक्रीया आदि सुविधा उपलब्ध नसल्यामुळेच रुग्णांना बीडला जावे लागते त्यामुळेच १५ दिवसात ट्रान्सफाॅर्मर न बसवल्यास संबधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.