झारखंड: साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. सापाचं नाव काढलं तरी भंबेरी उडते. साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

आईसारखे दैवत साऱ्या जगती नाही 

‘आईसारखे दैवत साऱ्या जगती नाही’ असं उगीच म्हटलं जात नाही. आई आपल्या लेकरांसाठी काहीही करु शकते. आईच्या प्रेमाची तुलना जगात कुठल्याही गोष्टींशी होऊ शकत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होतात ज्यात आईच्या मायेची पुष्टी दिसत असते. असाच एका कोंबडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एक कोंबडी आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी विषारी अशा नागासोबत भिडताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो नाग पिल्लांवर हमला करणार इतक्यात हि माउली पुढे येते आणि आपल्या पिल्लांसाठी प्राण पणाला लावून सापासोबत लढू लागते. तिथेच एका कोपऱ्यात कोंबडीची पिल्लं बिचारी घडणारा प्रकार पाहून शांतपणे बसलेली असतात.