भोकर येथे मानवहित लोकशाही पक्ष संपर्क कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन ...

 

संपादक उत्तम बाबळे यांची आध्यक्षस्थानी उपस्थिती

 

 मानवहित लोकशाही पक्षाच्या भोकर ता. संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवार (ता.१४) रोजी उद्घाटक ॲड.टी.एन कांबळे सर कोअर कमिटी अध्यक्ष यांच्या शुभहस्ते जल्लोषात संपन्न झाले. यावेळी आध्यक्षस्थानी जेष्ठ संपादक उत्तम बाबळे साहेब यांची उपस्थिती होती.

 

 

मानवहीत लोकशाही पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर, गजानन गाडेकर जिल्हा कार्याध्यक्ष,भोकर तालुका अध्यक्ष शंकर दिवटेकर, युवा तालुका अध्यक्ष अंबादास बोयावार, मुकुंद गोरलेकर शहर अध्यक्ष भोकर...यांच्या पुढाकाराने मराठवाड्यात प्रथम किनवट-भोकर रोडवरील बटाळा चौकाच्या दरम्यान भव्यदिव्य कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना ॲड.टी.एन.कांबळे म्हणाले की, तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांच्या अडचणी सोडवण्या करीता व उपेक्षित समाजाला वैचारीक प्रगल्भ करून महात्मा फुले, कार्तिगुरू लहुजी वस्ताद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालणारी पिढी तयार करण्यासाठी या कार्यालयाचा भविष्यात चांगला उपयोग होणार आहे..या भागात पक्ष बळकटीचे काम करणाऱ्यांना पक्षातर्फे ताकद देण्याचे प्रमुख काम यापुढील काळात केले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

 

शस्त्रपूजक लहुजी वस्ताद व रामजी सपकाळ या दोन महापुरुषांनी लेखणीचे वारसदार तयार केले. लहुजी वस्ताद यांनी महात्मा फुलें यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात मदत केली तर रामजी सपकाळ यांनी डॉक्टर बाबासाहेबांसाठी महान विद्वान तयार केले म्हणून शस्त्रापेक्षा लेखणीला अधिक महत्त्व आहे. १४ तारखेचे महत्व विषद करताना लहुजीचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ तारखेला झाला. समता, बंधुता न्याय हे लोकशाहीर अण्णा भाऊनी आपल्या फकिरात अधिष्ठित केले . पहिल्या शैक्षणिक परिषदेचे अध्यक्ष लहुजी वस्ताद साळवे होते तेथूनच महिला शिक्षणासाठी सुरुवात झाली, त्यांनी लेखणीचे वारसदार तयार केले व आपल्या पुतणीला शिक्षण घेण्यासाठी माता सावित्री कडे पाठवलं. अण्णा भाऊच्या परिवारातील आदरणीय, सचिन भाऊ साठे,मा.गणेशजी भगत पक्षांच्या माध्यमातून राज्यभर पुढे येत आहेत.लेखणीच्या वारसदाराच्या पक्षाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना व सल्लाही यावेळी संपादक उत्तम बाबळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना दिला .

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, पक्षाचे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष गणपती चंद्रभान घोडापुरकर,म.प्रचारक,व्यंकटी सोनटक्के,मराठवाडा सचिव बाळासाहेब खानजोडे, जिल्हा अध्यक्ष (उ.) किशोर कवडीकर जेष्ठ पत्रकार भोकर गंगाधर पडोळे,सुधांशु कांबळे, कमलाकर बरकमकर,म.जि.अध्यक्षा.पार्वतीताई बरकंबे, जिल्हा संपर्कप्रमुख नागेश महाराज घोडजकर,निर्मल जिल्हा सुरेखाताई पोलिसकर,धुरपतबाई बासनुरे,निर्मल सावित्रीताई पोलीसकर,जिल्हा अध्यक्ष (द.) मालोजीराजे वाघमारे, युवा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भंडारे लगळुदकर, साईनाथ गायकवाड नागठाणेकर (सरपंच),हदगाव तालुका अध्यक्षा वंदनाताई पोतरे,भोकर तालुका अध्यक्षा भाग्यश्री शिरगीरकर, सचिव छायाताई मोरे, युवा उपाध्यक्ष कैलास मोतेकर,सुनिल बरकंबे, दत्ता कांबळे बटाळेकर, सुभाष शेळके, धर्माबाद तालुका अध्यक्ष अनिल जुळने, धर्माबाद सो.मि.अध्यक्ष मोहन जगजेकर,मारोती गायकवाड, रामेश्वर शिंगणीकर, चंद्रकांत कुडकेकर, अमोल गायकवाड,माधव गाडेकर बटाळा,राजु टिकेकर, ...... पदाधिकारी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका उपाध्यक्ष अजय गव्हाळे, तालुका सचिव आनंदा चिलीमवाड, तालुका कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, तालुका सहसचिव संतोष काळे, रामेश्वर शिंगणीकर,युवा शहर अध्यक्ष भोकर अमोल गायकवाड बटाळेकर,माधव गाडेकर बटाळ, साईनाथ कवडेकर व समस्त मानवहित लोकशाही पक्ष तालुका भोकर

यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले.