पावसाळ्याचे दिवस असल्याने घ्यावंयाची काळजी बाबत शहरी भागातील आशा स्वयंसेविका व कर्मचाऱ्यांची आढवा बैठक

हिंगोली येथे आज दिनांक 04 ऑगस्ट रोजी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ गणेश जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा हिवताप कार्यालय येथे शहरी भागातील आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांची आढवा बैठक यामध्ये आशा स्वयंसेविका यांना रक्त नमुना घेण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये राष्ट्रीय किटक जन्य आजाराबाबत आढवा घेतला आहे तसेच पारेषन काळा बाबत करावयाची प्रतिबंधत्मक उपाय योजना याबदल माहिती दिली व आढवा घेतला सध्या पाऊस उघडल्यामुळे वातावरनात बदल होऊन सर्दी ताप डोके दुखी, इत्यादी आजार उदभवतात त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात एखादया नागरिकाला ताप आहे असे आढळून आले तर लगेच त्यांचा रक्त नमुना घेऊन तपासणी करिता पाठविण्यात यावा तसेच त्या भागात अबेटिंग, कंटेनर सर्वेक्षण करण्या बाबत सूचना दिल्या साचलेल्या डबक्यामध्ये गप्पी मासे सोडणे, 

  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ गणेश जोगदंड, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी छग्ग्न रणवीर, आदी अधिकारी उपस्थित होते