मुंबई: व्यक्ती आनंदात असताना कधी त्याच्यावर वाईट प्रसंग येईल सांगता येत नाही. काही गोष्टींचा आपण विचारही करत नाही आणि ती घटना घडल्यानंतर मनात मोठी पोकळी तयार होत असते. असंच काहीस झाल आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक नझतर गिल यांच्यासोबत. घरात आनंदाच वातावरण असताना नझतर गिल यांच्या पत्नी दलविंदर कौर यांच निधन झाल आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर 15 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

धक्कादायक गोष्ट म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी त्यांच्या दलविंदर आणि नझतर यांच्या मुलीच लग्न झाल होत. मोठ्या थाटामाटात लग्न झाल्यानंतर घरात आनंदाच वातावरण होत. पण याच दरम्यान पत्नीच अचानक निधन झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलीचं लग्न झाल्यानंतर दोन दिवसांनी मुलाच लग्न होत. या महिन्यात गायकाच्या घरात दोन लग्न होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नछतर आणि दलविंदर यांच्या मुलाच 17 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. परंतु आईच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे लग्न आता होणार की नाही याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. गायक नछतर यांच्या पत्नी दलविंदर यांच्यावर 16 नोव्हेंबरला बांगा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नछतर गिलला पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत त्याच्या 'दिल डिट्टा नही सी' गाण्याने ओळख मिळाली.

2022 मध्ये अनेक दिग्गज व्यक्तींनी घेतला अखेरचा निरोप

अभिनेता महेश बाबूचे वडील आणि तेलुगू सिनेमाचे सुपरस्टार कृष्णा यांचही वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाल. 2022 मध्ये सिद्धांत वीर सूर्यवंशी, राजू श्रीवास्तव, दीपेश भान, गान कोकिळा लता मंगेशकर, गायक बप्पी लाहिरी, गायक केके यांसारख्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला.