बीड (प्रतिनिधी):- पोलीस स्टेशन तलवाडा ता.गेवराई येथे विश्वनाथ जाधव या आरोपी विरूध्द शेतात काम करणार्‍या महिलेचा विनयभंग केला म्हणून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल असून सदरील आरोपीला तलवाडा पोलीसांनी अद्याप पर्यंत आरोपीला ताब्यात घेतले नसल्याने आरोपी विश्वनाथ जाधव याला तात्काळ अटक करावी या बाबतचे निवेदन मॉसाहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.कु.प्रेरणा सूर्यवंशी यांच्यासह पिडीत महिला व तीच्या कुटूंबीयांनी पोलीस अधिक्षक यांना दिले आहे. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिडीत महिला दि.7 नोव्हेंबर 2022 रोजी स्वत:च्या शेतात कापसाची वेचनी करत असतांना मारफळा तांडा येथील भावकीतील विश्वनाथ जाधव याने पाणी पिण्याचे कारण पुढे करत त्याने पिडीत महिलेला अश्लील भाषेत बोलणी करुन तीला लज्जा वाटेल असे कृत्य करत छेडछाड करुन विनयभंग केला. सदरील प्रकाराबद्दल पिडीतेने आपल्या पती व कुटूंबीयांना या बाबत माहिती देवून सदरील आरोपी विरुध्द तलवाडा पोलीस ठाण्यात दि.07/11/2022 रोजी फिर्याद देवून गुन्हा दाखल केला आहे. ज्याचा एफआयआर क्र. 232/2002 असा असून कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. परंतु अद्याप पर्यंत तलवाडा पोलीसांनी सदरील आरोपीस अटक केली नाही. पोलीस स्टेशन तलवाडा मधील कर्मचारी व अधिकारी हे राजकीय दबावापोटी व आर्थिक देवाण-घेवाण करुन सदरील आरोपीला मोकाट सोडले आहे. सदरील आरोपी हा गावामध्ये मोकाट फिरत असून त्याच्यापासून माझे जिवीतास धोका निर्माण झाला आहे. आरोपी हा मागील एक वर्षापासून पिडीतेला मानसिक त्रास देत आहे. सदरील या प्रकरणी पोलीस अधिक्षक यांनी या प्रकाराबाबत गांभीर्याने लक्ष देवून सदरील आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या तलवाडा पोलीसांना सुचना द्याव्यात नसता लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा मॉसाहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.कु.प्रेरणा सूर्यवंशी, पिडीत महिला व तीच्या कुटूंबीयांनी दिला आहे.