रत्नागिरी : मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि सामाजिक शास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली.

मुले ही देवाघरची फुले असे म्हटले जाते, लहान मुलांना देवाचे रूप मानले जाते या युक्तीप्रमाणे कॉमर्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शिरीष मुरारी मयेकर माध्यमिक विद्यालय चाफे आणि सुनील मुरारी मयेकर कनिष्ठ महाविद्यालय चाफे येथील विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळाद्वारे त्यांच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा स्मरणात याव्यात व मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढण्यासाठी द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांनी खेळ घेतले त्यामध्ये संगीत खुर्ची, डोळे झाकून काठीने डबा फोडणे, एका माचीसमध्ये मेणबत्ती पेटवणे, बादलीत बॉल टाकणे , रस्सीतून कप नेणे, पाण्याने भरलेल्या बादलीत कपात नाणे टाकणे, टेबलावर कप ठेवून नेम काढणे इत्यादी खेळ होते. या प्रत्येक खेळात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला. प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. 

या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा पालये,उपप्राचार्य गणेश कुळकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.अवनी नागले, श्वेता पवार, शशिकला सावंत, तृप्ती गावडे, ऐश्वर्या गोठणकर, निलम जाधव मंदार थेराडे व विद्यार्थी उपस्थित होते.