रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाचे तळेकांटे ते आरवली दरम्यान काम सुरू आहे. या भागाचे जे. एम. म्हात्रे कंपनीकडून काम सुरू आहे. मात्र मनमानी आणि अंदाधुंदी काम सुरू असल्याने स्थानिक लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कंपनीच्या विरोधात मुंबई महामार्गसाठी जन आक्रोश समिती संघटित झाली आहे. 28 नोव्हेंबर पर्यंत समस्या पूर्ण न केल्यास १ डिसेंबर रोजी जनता रस्त्यावर उतरणार असल्याचे लेखी पत्र माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी यांना देण्यात आले आहे.

 महामार्गावर पडलेले खड्डे महामार्गावरती असणारी धूळ, निष्कृष्ट दर्जाचा संरक्षण भिंती, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये टाकलेले डबल आणि गोठे, बांधण्यात आलेले नाळे, सुरू असलेल्या अनधिकृत क्रेशर, अनधिकृतपणे होत असणारी ब्लास्टिंग आणि त्यामुळे लोकांच्या घरांना गेलेले तडे, तोडलेले वृक्ष, रॉयल्टी न भरता सुरू असलेले उत्खनन, प्रदूषण नियंत्रणाचा कोणत्याही परवाना न घेता सुरू असलेले क्रेशर, कुरधुंडा येथे केलेले अनधिकृत बांधकाम अशा विविध समस्या घेऊन आज जण आक्रोश समितीने या राष्ट्रीय महामार्गाच्या समस्यांचा पाढाच वाचला. लोकांनी महामार्ग व्हावा यासाठी काही ठिकाणी मोबदला न घेता आपली घरे दुकाने आणि जागा शासनाला पुढे केलेली असता प्रशासनाकडून आणि संबंधित कंपनीकडून लोकांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. लोकप्रतिनिधी साखर झोपेत असल्याचे सांगण्यात आले. आमची सहनशीलता संपली असून आता आम्ही 28 तारखेपर्यंत वाट पाहणार. आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर 1 डिसेंबरला होणाऱ्या जन आक्रोश आंदोलनाला प्रशासनाने सामोर जावे असाही इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी रत्नागिरी, कार्यकारी अभियंता रत्नागिरी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ रत्नागिरी, खनि कर्म अधिकारी रत्नागिरी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी याना नोटीस देण्यात आली आहे.

यावेळी परशुराम पवार, रमजान गोलंदाज, युयूस्तु आर्ते, अतिश पाटणे, हरीस शेकासन, वहाब दळवी, असलम खान, शब्बीर मजगावकर, विशाल रापटे, शकील डी गनकर, अमित सामंत, मैरुणीसा साखरकर, रफिक साखरकर, अबूबकर मुकादम, अभी तळेकर,निलेश जाधव, सोहेल मुकादम, प्रतीक खैरे, रहीम दलाल, जमीर खलपे आदी उपस्थित होती.

दिलेल्या मागण्या पूर्ण करा अन्यथा १ डिसेंबरला सामोरे जा : रमजान गोलंदाज

 लोकांना होत असणारा त्रास झाला आहे डोईजड झाला आहे.त्यांची सहनशिलता संपली आहे. महामार्ग कधी होईल याची साश्वती नाही पण असलेला रस्ता तरी सुधारा हा ही आता आक्रोश घेऊन आम्ही रस्त्यावर येत आहोत. भूमिपुत्रा आणि अनधिकृत काम केलं तर त्यावर तात्काळ कारवाई करता मग दीड वर्ष अनधिकृत कारभाराला कोण पाठीशी घालतय याचा उलघडा प्रशासनाने तात्काळ करावा.दिलेल्या मागण्या पूर्ण करा अन्यथा १ डिसेंबरला सामोरे जा असा ईशारा रमजान गोलंदाज यांनी दिला आहेत.