आर्यनंदी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये कायदेविषयक कार्यक्रम उत्साहात..
पैठण प्रतिनिधी- ऋषिकेश मुळे.
पैठण तालुका विधी सेवा समिती व वकील संघ पैठण यांच्यातर्फे ढोरकिन येथील आर्यनंदी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी व पालक वर्ग यांना माहिती देण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट माननीय श्री विजय मुळे साहेब यांनी कायदेविषयक माहिती देऊन केले तसेच माननीय न्यायाधीश सिविल व क्रिमिनल कोर्ट पैठण श्री. जी. एस. हंगे साहेब यांनी पालकांना विद्यार्थी शिक्षक यांना कायदेविषयक सखोल माहिती देऊन प्रश्नांची उत्तरे देऊन उपस्थित पालकांना जागृत केले.
याप्रसंगी श्री चौरे साहेब पोलीस उपनिरीक्षक औद्योगिक वसाहत पैठण पोलीस ठाणे ,ॲड.विजय मुळे, ॲड. एस एस जाधव, ॲड. डी एस गव्हाणे, ॲड. पीपी बडे ,ॲड.एके फटांगडे,ॲड.बी जे वैद्य, ॲड. एस एस उगले, ॲड. एस बी पाटील ,ॲड.एस एन नाडे, ॲड. डीजे पैलवान, तसेच न्यायालयाचे कर्मचारी श्री आगे, श्री मोरे आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमात शाळेचे संस्थापक डॉक्टर प्राध्यापक प्रशांत होशील सर तसेच मुख्याध्यापक पंडित नाडे सर सहकारी शिक्षक वृंद विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.