सणसवाडीत बालविवाहाची तक्रार करणाऱ्या तक्रारदारावर गुन्हे

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जागेत प्रवेश करत उद्योजकास दमदाटी व जीवे मारण्याची धमकी

( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथे बालविवाह प्रकरणी तक्रार करणाऱ्या तक्रार दारासह दहा ते पंधरा जणांवरच आता एक महिन्यापूर्वी पत्राशेडमध्ये घुसून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत मुकेश पोपट भुजबळ, मनोहर पोतले, अमोल नप्ते, दत्तात्रय सांडभोर यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आहे.

                             सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गालगत रवींद्र भुजबळ यांच्या मालकीच्या जागेमध्ये त्यांनी यापूर्वी हॉटेल साठी पत्राशेड मारलेले आहे, कोरोनानंतर सदर हॉटेल बंद अवस्थेत आहे, तर १३ ऑक्टोबर २०२२ रोजी बालविवाह प्रकरणी तक्रार करणारा तक्रारदार मुकेश भुजबळ हा त्याच्या एम एच १२ एम एल ४०१० या कार मधून आला त्यावेळी एम एच १२ पी टी ९३३३ तसेच एम एच १४ एफ एक्स ०३६२ या कार मधून मनोहर पोतले, अमोल नप्ते, दत्तात्रय सांडभोर यांच्यासह अनोळखी दहा ते बारा इसम हातामध्ये काठ्या व लोखंडी गज घेऊन सदर ठिकाणी आले त्यांनी रवींद्र भुजबळ यांचा मुलगा राजेश भुजबळ यास हि जागा आमच्या मामाच्या मालकीची आहे, तुमचा येथे काहीही संबंध नाही, असे म्हणत हॉटेल मधील साहित्यांची तोडफोड करत राजेश यास तू मधी आलास तर तुला जीवे मारील अशी धमकी देत धक्काबुक्की केली तसेच मुकेश भुजबळ याने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार केली तर तुझ्या बापाचा मुडदा पाडील अशी धमकी दिली असल्याचे म्हटले आहे, याबाबत राजेश रवींद्र भुजबळ वय ३० वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मुकेश पोपट भुजबळ रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे, मनोहर पोतले रा. करंदी ता. शिरुर जि. पुणे, अमोल नप्ते, दत्तात्रय सांडभोर रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांच्यासह अनोळखी दहा ते बारा इसम यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.