नागपूर: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.आज शहरातील चितार ओळी परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बावनकुळेंचा निषेध केला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांच्या नेतृत्वात आजचे आंदोलन करण्यात आले. आक्रमक कार्यकर्त्यांनी आमदार बावनकुळे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. आमदार बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर बोलताना खोचक टोला लगावला. त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला आणि भोंदुबाबा असल्याचे ते म्‍हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध केला. चंद्रशेखर बावनकुळे हाय हाय म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. येवढ्यावरच कार्यकर्ते थांबले नाहीत, तर आमदार बावनकुळेंवर गुन्हे दाखल करा, अशीही मागणी त्यांनी केली. पोलिस अधिकाऱ्यांना तसे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.

आंदोलनात आभा पांडे, लक्ष्मी सावरकर, नूतन रेवतकर, रेखाताई कुपाले, संगीता खोब्रागडे, भारती गायधने, उर्मिला राऊत, अर्चना वावु, शोभा येवले, सुनीता येरणे, रेखा गौर, रमण ठवकर, अफजल फारुक, जानबा मस्के, वर्षा शामकुले, श्रीकांत घोगरे, शैलेंद्र तिवारी, संतोष सिंह, शैलेश पांडे, महेंद्र भांगे, सुखदेव वंजारी, रिजवान अंसारी, तनुज चौबे, चिंटू महाराज, गोविंद सूतरावे, अश्विन जवेरी, राजेश पाटील, प्रशांत बनकर, धर्मपाल वानखेडे, गोपाल ठाकूर, आशुतोष बेलेकर, निलेश चाफले, नारायण निखारे, नंदकिशोर माटे, एस.बी अहमद, शकील अहमद, अजहर पटेल, अमित पिचकाटे, राजा खान, अनिल बोकडे, आशुतोष गाटोडे, शमीम अहमद, अन्वर पटेल, हमीद भाई, आर. के. यादव, सोनू मिश्रा, रुपेश बांगडे, मोहन गुपचंद, अनंत रंगारी, विजय गावंडे, सुमित बोड़खे पाटिल, आकाश चिमणकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काय म्हणाले होते बावनकुळे?

राष्ट्रवादी कॉंग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे, तो जादूटोणा करणारा कोण याविषयी ते म्हणाले, जादूटोणा करणार कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. पवारांच्या ताब्यात आलेला सहजासहजी सुटत नाही. राष्ट्रवादीने जादूटोणा केल्यामुळेच चुकीच्या मार्गाला जाऊन अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले.