शिरुरमध्ये कोयत्याच्या धाकाने पंपावरील रक्कम लुटली
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिरूर येथील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये पहाटेच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून काही रक्कम व मोबाईल चोरून नेल्याची घटना घडल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिरूर येथील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये १२ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजता अंदाजे २५ ते ३० वर्षाच्या वयोगटातील अनोळखी इसम त्यांचेजवळील मोटार सायकलवरून पेट्रोल भरण्याचे बहाण्याने येत शरद नाना कोल्हे व पेट्रोलपंपावरील कामगार विकास कुमार श्रीवास्तव यास शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याचा धाक दाखवुन कोयत्याच्या उलट्या बाजुने विकासकुमार यास मारहान करून त्याचेजवळील ऐकोनपन्नास हजार रुपये व विवो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला आहे. याबाबत शरद नाना कोल्हे रा. शिरूर ता. शिरूर जि. पूणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिरूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटिल हे करत आहे.