रत्नागिरी जिल्हयात ३०२ गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत कृषी आयुक्तांनी आदेशित केले असून हवामान विभागाच्या निकषानुसार ग्रामपंचायतीकडून जागांचा शोध सुरु आहे. मात्र जागा उपलब्ध करुन देणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करुन हे केंद्र उभारण्यात येणार आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
प्रत्येक जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात हवामान केंद्र उभारणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जी ग्रामपंचायत जागा उपलब्ध करुन देईल तेथे केंद्र उभारले जाणार आहे.
शेतकऱ्यांना होणार लाभ
स्वयंचलित हवामान केंद्र उभारल्यास पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वान्याची दिशा व वेग आदी प्राप्त होणाऱ्या माहितीचा वापर पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन आदी उपक्रमासाठी होणार आहे.