रत्नागिरी: महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री ॲड. अनिल परब यांच्या दापोलीतील बेकायदेशीर साईरिसॉर्टप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी आपला चारपानी जबाब नोंदवून घेतला असून 62 पानांचे पुरावे आपण पुन्हा पोलिसांना सादर केले आहेत. पोलीस कायदेशीर प्रक्रिया करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला साईरिसॉर्ट तोडण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून ठेकेदाराची नियुक्ती झाल्यानंतर ज्या दिवशी साई रिसॉर्ट तोडले जाईल त्या दिवशी मी दापोली येथे हजर राहणार असल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
रत्नागिरीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. पालकमंत्री असताना अधिकाराचा वापर करून दापोली येथे बेकायदेशीर साई रिसॉर्ट उभारण्यात आले. आपण आवाज उठवल्यानंतर ते सदानंद कदम यांना विक्री केल्याचे दाखविण्यात आले. परंतु खरेदी-विक्री प्रकरणातील पैसे दिल्याचा तपशील अनिल परब यांनी का लपवला आहे? असा प्रश्न श्री. सोमय्या यांनी उपस्थित केला.
खरेदीखतामध्ये सर्व तपशील नमूद नसताना उपनिबंधकांनी तो नोंदवून कसा घेतला. ज्या अर्थी चुकीचे खरेदीखत नोंदवून घेतले गेले, याचा अर्थ अधिकारी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत होते हे स्पष्ट झाले आहे. खोटे कागदपत्रे जोडून जागा बिनशेती करण्यात आले. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा करण्यात आल्याने खोटा दस्तऐवज देऊन बिनशेती केल्याचा गुन्हा अनिल परब यांच्याविरोधात दाखल करण्यात यावा अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनीही चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे श्री. सोमय्या यांनी सांगितले.
साई रिसॉर्ट तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदा मागविल्या आहेत. त्यानंतर निविदा उघडून ठेकेदार निश्चित केला जाईल. यासाठी पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यानंतर साईरिसॉर्ट तोडण्याच्या कामाला सुरूवात होईल. त्या दिवशी आपण दापोली येथे उपस्थित राहणार असल्याचे श्री. सोमय्या यांनी सांगितले. बेकायदेशीर साईरिसॉर्ट उभारण्यात ज्या अधिकाऱ्यांचा आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण आग्रही राहणार आहोत. बेकायदेशीर प्रकरणातील एकालाही आपण मोकळीक देणार नसल्याचे श्री. सोमय्या यांनी म्हणाले.
चित्रपटगृहात बसून प्रेक्षकांना दमदाटी करत धमकी देणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. आता माफियांचे सरकार गेले असून शिंदे- फडणवीसांचे सरकार आले आहे. त्यामुळे चुकीचे काम करणाऱ्या कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही असा चांगला संदेश सरकारने दिला आहे. तर यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ज्यांना मारहाण केली आहे त्या विषयातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री. सोमय्या यांनी केली.