औरंगाबाद :- (दीपक परेराव)विश्वकर्मा फॅब्रिकेशन आणि फर्निचरचे मालक - चालक लक्ष्मण वाघ साहेब.(मामा) , व त्यांचे दोन्हीं चिरंजीव संतोष आणि शिवा यांच्या हातून, यांच्या अथांग मेहनतीतून बनवलेल्या बैलगाडीच्या भेटवस्तू निमित्ताने गुजरात मधील एक शेतकरी आणि भा.ज.पा. पार्टीचे कट्टर समर्थक कार्यकर्ते यांच्या निधीतून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना हार्दिक शुभेच्छा देउन ती भेटवस्तू म्हणुन देन्यात आली असता, मोदी साहेबांच्या मुखातून आणि अनेक आपल्या भारतीयांच्या मुखातून वाणीतून या बैलगाडीचे निर्मातेचे कौतुक आणि प्रशंसा करण्यात आली.
त्याप्रसंगी एक विषय अनुसरून प्रशंसा आणि कौतुकास्पद भेट आणि या उद्योगाला एक चालना आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून आपल्या मराठवाड्यातील अनेक चाहत्यांची ओढ या कलाकारांना ऑनलाईन शुभेच्छा आणि कौतुकास्पद प्रतिक्रिया त्या दिवशीपासुनच मिळत होत्या पण आज प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यास सुरुवात झाली आहे. तरी आज शुभेच्छा देण्याकरिता शिर्डी साई बाबा देवस्थान कमिटी मधील सदस्य तसेच साई भक्त.नितीन चौधरी (प्रहार दिव्यांग क्रांती संपर्क प्रमुख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष.)रामनाथ दाभाडे.(शिर्डी.)तसेच दिलीप अनंता थोरात.(श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळेचे अध्यक्ष, आळंदी देवाची पुणे.) तसेच त्यांच्या पत्नी सौ.प्रतिमाताई थोरात,पुणे यांनी आज आपल्या साईमंदिर समोर या ठिकाणी प्रत्यक्षात येऊन भेट दिली व शिवाचे आणि वाघ मामांच्या कला कौशल्याचे खास कौतुक आणि प्रशंसा अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व धन्यवाद दिले, व पुढील उद्योगास बळ मिळावे यासाठी प्रयत्न करु आणि या उद्योगाचे वट वृक्षात रूपांतर लवकरच होईल, अशी प्रार्थना साईचरणी केली.
तरी वाघ मामा याच्या हस्ते बनवलेली बैलगाडी आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबापर्यंत पोहचली उत्तम करागिरीची सुंदर बैलगाडी म्हणुन मोदी साहेबांच्या वाणीतून प्रशंसाजनक प्रतिक्रिया मिळाली त्याबद्दल
तुमच्या कला कौशल्याची आज खरच करावी तितकी प्रशंसा कमीच, अभिनंदन शिवा, संतोष, आणि वाघ मामाश्री आपल्या कामाला अशिच प्रशंसाजनक दाद आणि मागणी लाभो हिच साई चरणी प्रार्थना
आजच्या या आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सभारंभ आनंदात पार पडला या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन व स्वागत वाघ मामा यांनी केले, तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हिवाळे , वैष्णव आणि सुलताने ताई यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्र संचालन गाडेकर यांनी केले.