सणसवाडीत बाल विवाह प्रकरणी माजी सरपंचांसह चौघांवर गुन्हे
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरूर येथे दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय युवतीचा बालविवाह केल्याची घटना घडली असताना आज शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सणसवाडीच्या माजी सरपंच असलेल्या नवरदेव मुलाची आई रोहिणी रवींद्र भुजबळ, नवरदेवाचे वडील रवींद्र बापू भुजबळ, युवतीचे वडील रमेश उर्फ रामदास दिलीप ताम्हाणे, युवतीची आई रेश्मा रमेश ताम्हणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी ता. शिरूर येथील उद्योजक रवींद्र भुजबळ व सणसवाडीच्या माजी सरपंच रोहिणी भुजबळ यांनी त्यांचा मुलगा केतन याचा विवाह तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर माध्यमिक विद्यालय येथे दहावीचे शिक्षण घेणाऱ्या एका सोळा वर्षीय युवतीशी मोठ्या थाटामाटात ४ ऑगस्ट २०२२ रोजी कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय येथे केला, याबाबत एका युवकाने पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण सह शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी याबाबत चौकशी करत काही पुरावे गोळा करुन युवतीच्या वयाचा पुरावा देखील सदर विद्यालयातून मिळविला, दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी सर्व माहिती सनसवाडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे यांना दिली, त्यानुसार ग्रामविकास अधिकारी यांनी सर्व प्रकारची चौकशी करत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बालविवाहाची फिर्याद दिली, याबाबत सणसवाडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पाळणात हरिश्चंद्र पवणे वय ५५ वर्षे रा. रामलिंग रोड शिरूर ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. टाकळी खंडेश्वरी ता. कर्जत जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सणसवाडीच्या माजी सरपंच असलेल्या नवरदेव मुलाची आई रोहिणी रवींद्र भुजबळ, नवरदेवाचे वडील रवींद्र बापू भुजबळ, युवतीचे वडील रमेश उर्फ रामदास दिलीप ताम्हाणे, युवतीची आई रेश्मा रमेश ताम्हणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.