रांजणगाव गणपती: आर एम धारीवाल फाउंडेशन व महागणपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी ʼरांजणगाव मॅरेथॉन 2022ʼ हि स्पर्धा संपन्न होणार आहेत. आर एम धारीवाल फाउंडेशन च्या अध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा होणार आहे असे महागणपती फाउंडेशन चे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी सांगितले.
या स्पर्धेत 3 किमी 5 किमी आणि 10 किमी (मुले - मुली) असे 3 गट असणार आहे. तसेच स्पर्धेत 2 लाख रुपयांची रोख बक्षिस देण्यात येणार असुन या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धेकांना टि शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 10 वर्षाच्या वरील सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येईल.
ʼरांजणगाव मॅरेथॉन' स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असुन गेले दोन वर्ष कोरोनामुळे हि होऊ शकली नाही. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 9595689696 आणि 9657663383 या नंबरवर संपर्क करावा. तसेच Online Registration साठी https://www.townscript.com/e/ranjangaon-marathon-2022-234204 या लिंकवर क्लिक करा.