रत्नागिरी शहरानजिकच्या भाट्ये खाडी साचलेला गाळ राजिवडा, भाटे, कर्ला आणि फणसोप या परिसरातील मच्छिमारांना डोकेदुखी बनली आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून हा प्रश्न आता मच्छिमारांसाठी भवितव्याच्या दृष्टीने अडचणीचा ठरणार आहे. नुकतेच झालेल्या जनता दरबारामध्ये रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी तात्काळ गाळ उपसावा असे आदेश दिले आहे. मात्र ढीम्म असणारे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. उच्च न्यायातील वकील ॲड. ओवेस पेचकर यांनी काल भाटे खाडीला भेट देत मच्छिमारांच्या समस्या विषयी माहिती जाणून घेतली. प्रशासनाने यावर पंधरा दिवसात काम सुरु न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार आता मच्छिमारांनी केला आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जमातून मुस्लिम राजवडा कोरम कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष रागितीच्या प्रमुखांनी नुकतेच ॲड. ओवेस पेचकर यांची भेट घेऊन मच्छिमारांच्या समस्या समजावून सांगितल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्षात भाटे खाडीची पाहाणी केली. या गाळामुळे अनेक नौकांचे नुकसान झाले असून मच्छिमारांना याचा भुर्दंड पडला आहे. यापूर्वी ही शासन दरबारात या विषयी पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. संबंधित विभागाने १५ दिवसात जर गाळ उपसा सुरू केला नाही तर ॲड. ओवेस पेचकर यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा निर्धार आता मच्छिमार वर्गाने केला आहे. यावेळी ॲड. ओवेस पेचकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, शब्बीर भाटकर, नजीर वाडकर उपस्थित होते.