पाथरी ता(प्रतिनिधी)शिवसेना पाथरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख डॉ .राम शिंदे यांची शिव आरोग्य सेना मराठवाडा डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . मुंबई येथे अनिल देसाई यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे .
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिव आरोग्य सेनेची महाराष्ट्र कार्यकारणी स्थापित झाली असून शिव आरोग्य सेनेच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षा डॉ . शुभा राऊळ ,कार्याध्यक्ष डॉ .किशोर ठाणेकर यांनी डॉ . राम शिंदे यांची मराठवाडा विभागीय शिव आरोग्य सेना अध्यक्ष म्हणून निवड केली आहे .या निवडीचे नुकतेच मुंबई येथे अनिल देसाई व शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ .किशोर ठाणेकर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे .
या निवडी बद्दल जिल्ह्याचे खासदार संजय जाधव , आ . राहुल पाटील ,सहसंपर्कप्रमुख पंढरीनाथ धोंडगे,डॉ.विवेक नावंदर ,शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम ,सुरेश ढगे ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल सरोदे ,बालाजी देसाई ,
दलित आघाडी जिल्हाप्रमुख संजय सारणीकर , युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक बाराहाते , अर्जुन सामाले , सेलु विधानसभाप्रमुख राम नाना खराबे , उपजिल्हाप्रमुख रंजीत गजमल,
माजी जि.प . सदस्य रंगनाथ वाकणकर ' माणिकआप्पा घुंबरे ,गंगाप्रसाद आणेराव , उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे , अनिल कदम ,मधुकर निरपणे ,माणिक आव्हाड , तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे , पंढरीनाथ घुले ,माणिकराव काळे , दत्ता जाधव , भगवान पायघन ,शहर प्रमुख बालाजी दटे , कृष्णा पिंगळे ,राहुल पाटील
युवासेना तालुकाप्रमुख पप्पू वाघ , पांडुरंग शिंदे , संतोष गवळी कृष्णा शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी स्वागत केले आहे .