कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आधी मालगाड्या तर त्या पाठोपाठ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या देखील विद्युत इंजिनसह चालविल्या जात आहे. यानुसार आता मुंबई सीएसएटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (12051/12052) दि. 9 नोव्हेंबरपासून, इंदोर कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेस (20932/20931) दि. 8 नोव्हेबरच्या फेरीपासून विजेवर धावू लागली आहे. ही गाडी कोचुवेली ते इंदूर मार्गावर धावताना दि. 11 नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहे.
याचबरोबर भावनगर ते कोचुवेली (19260/19259) ही कोकण रेल्वेमार्गे धावणारी आणखी एक साप्ताहिक एक्स्प्रेस दि. 15 नोव्हेंबर 2022च्या फेरीपासून विद्युत इंजिनसह धावणार आहे. ही गाडी कोचुवेली ते भावनगर मार्गावर धावताना ही गाडी दि. 17 नोव्हेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिनसह धावणार आहे.
कोकण रेल्वे मार्गे धावणार्या प्रवाशांच्या पसंतीच्या गाड्यांपैकी एक असलेल्या मुंबई सीएसएटी -मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेससह इंदोर-कोचुवेली तसेच कोचुवेली- भावनगर या तीन गाड्या देखील आता डिझेल ऐवजी विद्युत इंजिनसह धावणार आहेत. या पैकी मुंबई सीएमटी ते मडगाव दरम्यानची जनशताब्दी एक्स्प्रेस दि. 9 नोव्हेंबर रोजी मुंबईतून मडगावसाठी धावताना विद्युत इंजिनसह धावणार आहे.