रामटेक: सध्या रामटेक येथे एक 13 फूटांचा अजगर सापडला आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील डोंगरी येथे आढळलेल्या 13 फूट अजगराला जीवनदान मिळालंय. वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनाइजेशन सर्पमित्र व प्राणीमित्र या संस्थेच्या सदस्यांनी या 13 फूट लांबीच्या अजगराला त्याच्या अधिवासात सोडले. रामटेक जवळील डोंगरी येथील सुनील नागपुरे शेतात धान कापत असतांना त्यांच्या पायाजवळ एक मोठा अजगर साप आढळून आला. शेतात इतका मोठा साप दिसल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

तातडीने वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्राचे सदस्यांना तिथे बोलविण्यात आले. त्यांनी लोकांना दूर करूत सावधतेने 13 फुटांच्या मोठ्या अजगरला कोणत्याही पद्धतीची इजा न होऊ देता सुखरूप रित्या पकडले. त्यानंतर वन विभागाकडे सुपूर्द करत त्यानंतर त्या अजगराला पुन्हा त्याच्या अधिवासात सोडण्यात आल.