जालना जिल्ह्यात ‘वंचित’ने सोसायटीत पहिले खाते उघडले; विजय लहाने बिनविरोध
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
जालना/प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीने जालना जिल्ह्यात वंजार उमरद विविध विकास सहकारी सोसायटीवर पहिलेच बिनविरोध खाते उघडले. ’वंचित‘ चे विजय नामदेवराव लहाने हे बिनविरोध निवडून आले आहेत.
वंजार उमरद विविध विकास सोसायटीची निवडणूक सहकार विभागाच्या अधिकार्यांनी जाहिर केली. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता.मात्र वाघ्रुळ सर्कलमधील वंजार उम्रद व माळशेंद्रा गावातील सभासदांनी एकत्रीत येवून सदरील सोसायटी बिनविरोध करण्याचे ठरविले. त्यानुसार या सोसायटीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे व माळशेंद्रा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय नामदेवराव लहाने यांची बिनविरोध निवड झाली आली.
तर अन्य सोसायटीच्या बिनविरोध सदस्यामध्ये बाबासाहेब रंगनाथ सहारे, ब्रह्मा बाबुराव वाघ, बाळासाहेब साहेबराव जाधव , रामभाऊ मुक्ताजी वाघ , गुणाजी बापुराव पालवे,नाना रायभान वाघ, संतोष वामनराव वाघ,भानुदास राणोजी सहारे, दगडाबाई नारायण वाघ , कमल रावसाहेब वाघ, शिवाजी दामाजी लहाने, अर्जुन बाबुराव वाघ यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अवधुत यांनी काम पाहिले.
विजय लहाने यांचा सत्कार
वंचितचे विजय लहाने यांची सोसायटीवर बिनविरोध निवड झाल्याचे कळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हीड घुमारे यांच्यासह पदाधिकार्यांनी त्यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके.परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे अकबर इनामदार, ज्ञानेश्वर जाधव, खालेद चाऊस, लाला भाई, संतोष आढाव, कसबे, मनोज वाकोडे, संतोष लोखंडे, त्रिंबक बोडखे, सुखदेव लहाने आदिंची उपस्थिती होती.