वाशीमच्या मालेगावं पोलिसांना 06 नोव्हेंबर रोजी गोपनिय माहिती वरून केलेल्या कारवाईत दोन मोटार सायकल चोरासह 12 मोटार सायकल जप्त करण्यात यश आले आहे.

प्राप्त माहिती वरून ग्राम पांगरीकुटे येथे संतोष गजानन इंगोले वय 22 वर्ष रा . पांगरीकुटे हा चोरीची मोटार सायकल घेवुन गावात वावरत आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहिती वरुन मालेगांव येथील पोलीस पथकाने संतोष गजानन इंगोले यास त्याचे राहते घरा मधुन ताब्यात घेवून त्याचे जवळ असलेल्या मोटार सायकल चा इंजीन क्रमांक व चेचीस क्रमांकाची शहानिशा केली असता सदरची मोटार सायकल पो.स्टे . मालेगांव अप.क्र .412 / 22 क .379 भादंवि मधील MH 28 AK - 0972 Splendor plus असल्या बाबत दिसुन आल्याने आरोपी संतोष इंगोले यास मोटार सायकल सह ताब्यात घेवून त्यास इतर चोरलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने यापुर्वी सुध्दा मालेगांव तालुक्या मधुन व आजु बाजुचे परिसरा मधुन इतर मोटार सायकल सुध्दा चोरी केल्या बाबत कबुली दिली व त्या सर्व मोटार सायकल त्याचा ओळखीचा त्याचा साथीदार नामे मोहमंद राजीक शेख महेमुद वय 41 वर्ष रा . रोहीणखेड ता . मोताळा जि.बुलडाणा यास दिल्याचे सांगीतल्याने मोहमंद राजीक शेख महेमुद यास ताब्यात घेवुन आरोपी संतोष गजानन इंगोले यांचेकडुन एकुण 03 मोटार सायकल व मोहमंद राजीक शेख महेमुद यांचे ताव्या मधुन एकुण 9 मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्यात . दोन्ही आरोपी कडुन नमुद वर्णनाचा मोटार सायकल ताब्यात घेवून पोलीस स्टेशन मालेगांव येथे आणण्यात आल्या आहेत . 1. एक काळया रंगाची नंबर नसलेली Unicorn मोटार सायकल 2. एक हिरोहोंन्डा कंपनीची निळा काळा पट्टा असलेली मोटार सायकल 3. एक हिरो कंपनीची काळा पट्टा असलेली मोटार सायकल 4. एक Honda कंपनीची लाल पट्टा असलेली Shine मोटार सायकल 5. एक Hero कंपनीची लाल पट्टा असलेली एक मोटार सायकल 6. एक Honda कंपनीची Shine मोटार सायकल 7. एक Hero कंपनीची HF Delux निळा काळा पट्टा असलेली मोटार सायकल 8. एक Honda Shine कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल 9. एक Hero Honda Splendor कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल 10. एक Hero Splendor कंपनीची निळा पट्टा असलेली मोटार 11. एक Hero कंपनीची HF Delux लाल पट्टा असलेली मोटार सायकल 12. एक Hero कंपनीची HF Delux लाल पट्टा असलेली मोटार सायकल वरील प्रमाणे हस्तगत करण्यात आलेल्या गाडयाचे मुळ मालकाचा शोध घेवुन त्यांना रितसर ताब्यात देण्याची प्रक्रिया करण्यात येत असुन नमुद दोन्ही आरोपीतांचान्यायालया कडुन पीसीआर मंजुर करुन घेवुन त्यांनी अजुन कोण कोणत्या भागात मोटार सायकल चोरी केलेली आहे याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे . सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे व उपविपोअ वाशिम सुनिल पुजारी यांचे मार्गदर्शनामध्ये मालेगांव येथील प्रभारी अधिकारी पो . नि . किरण वानखडे , सपोनि तानाजी गव्हाणे , ASI.रवि सैबेवार , पोहेकॉ . कैलास कोकाटे पोहेकॉ . प्रशांत वाढणकर पोहेकॉ . अनिल कांबळे , पोकॉ . अमोल पाटील , पोकॉ . जितु पाटील यांचे पथकाने केली आहे .