जत: आईचे लेकरावर किती उपकार असतात हे एक मुलगा किंवा मुलीशिवाय कोण ओळखू शकणार नाही. आई आपल्या लेकरांसाठी स्वत:चा विचार करत नाही. ती आपल्या मुलांसाठी एकवेळ स्वत:च्या जीवाची बाजी लावते. ती आपल्या मुलांना काय हवं नको ते पुरवते. आपल्या मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती आपल्या बाळासाठी नऊ महिने यातना सोसते.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

आईचं महत्त्व शब्दांमध्ये कधीच मांडता येणार नाही असं असतं. पण काही नराधमांना आपल्या आईची किंमत नसते. ते स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्या आईच्या जीवाची पर्वा करत नाहीत. सांगली जिल्ह्यातून देखील अशीच काहीशी घटना समोर आलीय. एका नराधमाने आपल्या सख्ख्या आईची दगडाने ठेचून हत्या केलीय. अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात घडली आहे. माडग्याळ-व्हसपेठ हद्दीच्या जवळ शेतातील घरात मुलाने आईचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे.

जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शांताबाई अण्णाप्पा कोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर खून करणारा नराधम हा सुरेश आण्णाप्पा कोरे हा शांताबाई यांचा एकुलता एक मुलगा आहे. शांताबाईंच्या पतीचे पूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे आई आणि मुलगा दोघेच शेतातील घरामध्ये राहत होते. या दरम्यान रविवारी दुपारी शेतामध्ये आई आणि मुलगा यांच्यात वादावादी झाली. या वादातून सुरेशने आईच्या डोक्यात दगड घालून आणि दगडाने ठेचून खून केला.