शिरुर: राजकारण हे स्वच्छ असावं. एकदा आर्थिक घडी विस्कटली तर ती व्यवस्थित होण्यासाठी वेळ लागतो. घोडगंगा कारखान्यावर 400 कोटी कर्ज नाही. विरोधक खोटा प्रचार करत आहे .साखर कारखान्यांवर सर्व अधिकारी, सरकारचे लक्ष असते. यावर्षी खूप पाऊस पडल्याने ऊस तोडण्यासाठी अजून वाफसाआलेला नाही.साखर कारखान्यांना एक्सपोर्ट कोटा दिलेला आहे .त्यामुळे ठराविक कोट्यानेच साखर विकावी लागते.त्यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान होत आहे. ही कोटा पद्धत शेतकऱ्यांना हानिकारक आहे. उमेदवारीचे तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका. घोडगंगासाठी मतदान करताना अशोक पवारांवर विश्वास ठेवून संपूर्ण पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केले.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गुरवार (दि 3) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारसभेसाठी अजित पवार मांडवगण फ़राटा येथे आले होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की," शिरूरचा भाग महाराष्ट्रात एक नंबरचा बागायती भाग आहे. कारखान्यासमोर अडचणी असतील तर त्या दुर केल्या जातील. तीन वर्षे सेना भाजप सरकारने वीज खरेदी केली नाही. त्याचा कारखान्याला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनही निर्यात बंदी आहे. हे धोरण घातक आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या अडचणी मोदी साहेबांना समजून सांगाव्यात. मोठ्या उद्योगपतीना सवलती देतात परंतु शेतकऱ्याना मदत केली जात नाही. मतदार राजाने सर्व पॅनेलला निवडून द्यावे असे आवाहन केले.