हिंगोली तालुक्यातील संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव मंदिरामध्ये दिनांक चार नोव्हेंबर रोजी सकाळी कार्तिक एकादशी निमित्त दीप महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी चार वाजल्यापासून भजनी मंडळींनी काकडा भजन सुरू करून नामदेव महाराज जयंती निमित्त मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघाले होते. संत नामदेव मंदिरावरील विद्युत रोषणाई येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे लक्ष् वेधून घेत होते. टाळ मृदंगाच्या निनादात संत नामदेव महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्तिक एकादशी व संत नामदेव जन्मोत्सव असल्याने भाविकांनी चार वाजल्यापासूनच दर्शनासाठी रंग लावल्या होत्या. सकाळी वाजता महापूजेसाठी भाजपाचे युवा नेते शिवाजीराव मुटकुळे, सतीश विडोळकर,शशिकांत वडकुते,सुभाष हुले,माणिक लोडे,कवी शिवाजी कऱ्हाळे,विठ्ठल माने,यांच्या प्रमुख उपस्थित महापूजा घेण्यात आली. मंदिर परिसरा मध्ये संत नामदेव महाराज यांचे रांगोळी खूपच सुंदर काढली होती. संत नामदेव महाराज जन्मोत्सव मुळे गेल्या सात दिवसापासून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सुद्धा होत आहेत.