वाशीम जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 4 ऑक्टोबर रोजी कारंजा तालुक्यातील किन्ही (रोकडे), चांदई व अंबोडा या गावातील काही शेताला भेट देऊन नाविन्यपूर्ण पिक लागवडीची पाहणी केली. यावेळी त्यांनी या पिक लागवडीविषयी माहिती जाणून घेतली. किन्ही (रोकडे) येथील पियुष काटकर यांनी बीबीएफ तंत्राने लागवड केलेल्या हरभरा पिकाची माहिती घेतली. पारंपरिक पीक पेरणी व बीबीएफ पिक पेरणीमुळे उत्पन्नात किती फरक पडतो हे त्या शेतकऱ्याकडून जाणून घेतले. चांदई येथील श्रीमती रक्षा मोटघरे यांच्या शेतात लागवड केलेल्या ड्रॅगन फळबागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी या नाविन्यपूर्ण फळबागेबद्दल माहिती घेतली. तसेच सघन आंबा लागवड, शेवगा लागवड तसेच इतर प्रकारे फळपीक लागवड केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांची प्रशंसा केली.अंबोडा येथील शेतकरी गटामार्फत लागवड करण्यात आलेल्या करडई पिकाची पाहणी केली. सर्व शेतकरी हे हरभरा बीज प्रक्रिया करूनच पेरणी करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जटाळे, कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे, सुनील शिंदे, पी. बी. ठाकरे, मंडळ अधिकारी सी. डी. मनवर, तलाठी सविता देशमुख, कृषी सहायक मंगेश सोळंके, मोहन ठाकरे, सीमा पवार, राम मार्गे, व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस ट्रेन का नुआपड़ा स्टेशन पर ठहराव....
रेल्वे की सम्पूर्ण जानकारी के लिए हमे फॉलो करे sms news
रेल प्रशासन द्वारा यात्रियों की सुविधा के लिए ट्रेन संख्या 12844/12843 अहमदाबाद-पुरी-अहमदाबाद...
न्यू ईयर के लिए WhatsApp ने जारी किए नए फीचर्स, कॉलिंग होगी और भी मजेदार
नए साल को आने में सिर्फ कुछ ही दिन बाकी हैं। साल 2024 जल्द ही अलविदा होने वाला है। ऐसे में नए साल...
मा.आमदार मोहन फड यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी च्या ग्रामीण शाखेचे उद्घाटन
मा.आमदार मोहन फड यांच्या हस्ते ग्रामिण शाखेचे उद्घाटन
मानवत:-तालुक्यातील रत्नापुर येथे
आज...