बोकुडजळगाव व तांडा आणि चिंचोली येथील डिपी न बदल्यास शेतकऱ्यांचा रास्तारोको व आत्मदहनाचा इशारा....
बिडकिन येथील सहायक अभियंता कार्यालयास देण्यात आले निवेदन....
बिडकिन प्रतिनिधी:-
आज दि.०३ रोजी पैठण तालुक्यातील बोकुडजळगाव,तांडा,व चिंचोली येथील शेतीसाठी असलेली डिपी (ट्रान्सफॉर्मर) मागील ०८ दिवसांपासून जळालेले असून अद्यापही वारंवार मागणी करूनही बदलून अथवा दुरुस्त करून न देण्याचे काम अद्याप पर्यंत न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने औरंगाबाद ते पैठण रोडवरील महावितरण कार्यालय बिडकिन येथे रास्तारोको व आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
महावितरण विभागाच्या वतीने डिपी ट्रान्सफॉर्मर न बदलता जळालेली डिपी ट्रान्सफॉर्मर हि काढुन नेण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, मागील आठ दिवसापासून जळालेली डिपी ट्रान्सफॉर्मर याबाबत परिसरातील शेतकरी यांचे शिष्टमंडळ हे औरंगाबाद येथील महावितरण विभागास या डिपी ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती किंवा बदलण्याच्या मागणी बाबतीत विचारपूस करण्यासाठी गेले असता मुख्य अभियंता व सहायक अभियंता यांच्या वतीने पुर्ण थकीत बिले भरा, त्याशिवाय डिपी ट्रान्सफॉर्मर बदलल्या जाणार नसल्याचे सांगण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांनी टप्प्याने थकीत बिले भरण्यासाठी तयार झाले असताना हि कुठल्याही प्रकारची माहिती न मिळाल्याने शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदहन व रास्तारोको आंदोलन बाबतीत निवेदन बिडकिन सहायक अभियंता चव्हाण यांना देण्यात आले आहे.शेतकर्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास त्यात पिकांना पाणी न मिळाल्यास सर्व नुकसान होईल याची काळजी लागत आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांच्या समवेत बोकुडजळगाव व चिंचोली येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी सहायक अभियंता कार्यालयाला निवेदन दिले.
यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की,दि.०४/११/२०२२ पर्यंत डिपी ट्रान्सफॉर्मर बदलल्या न गेल्यास ते रास्तारोको व आत्मदहन करणार आहेत.निवेदन देत असताना आंदोलन कर्ते जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, बोकुड जळगाव सरपंच रामेश्वर लोखंडे,जांभळी/चिंचोली सरपंच गणेश राठोड,बोकुडजळगाव उपसरपंच मधुकर मरकड,बोकुड जळगाव चे ग्रामपंचायत सदस्य एल.पी.चव्हाण, नितीन धुम्मा चव्हाण, चिंचोली येथील दिनकर कळसकर,दिनकर कोळगे, रामेश्वर कळसकर, कल्याण कळसकर यांनी निवेदनावर सहिनीशी मागणी केली असुन आदींसह मोठ्या प्रमाणावर शेतकरी यांची उपस्थिती होती.
रविंद्र गायकवाड, बिडकिन