रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी मधील विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी रहाटघर बसस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानकांची पाहणी केली. रहाटघर बसस्थानकाची रंगरंगोटी आणि परिसर सिमेंट कॉन्क्रीटीकरणसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा तसेच मध्यवर्ती बसस्थानकाचे काम लवकरात लवकरात होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय अभियंता श्री. मोहिते, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक ओ. बी. पाटील उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकमान्य टिळक स्मारक, तारांगण, लोकमान्य टिळक वाचनालय, रत्नागिरी नगरपरिषद, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आदि ठिकाणी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली.
त्यानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेतला.