जल जीवन मधील गैरव्यवहार प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून चौकशी करा अन्यथा आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप
सामाजिक कार्यकर्त्यांवरती हल्ले करणाऱ्या हल्लेखोर मोकाट फिरत आहेत त्याला अटक करा
बीड मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार प्रकरणांमध्ये आज वीस फूट बॅनर लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली केंद्र आणि राज्य यांच्या संयुक्त अभियाना अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जलजीवन ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये गैरव्यवहार झालेला असून यावरती आवाज उचलणारे सामाजिक कार्यकर्त्यावरती हल्ले होत आहेत ते हल्लेखोर मोकाट फिरत असून त्यांच्यावर कारवाई करावी याची चौकशी एसआयटीच्या मार्फत करण्यात यावी व यामध्ये दोषी असलेले अधिकारी जनप्रतिनिधी सरपंच जिल्हा परिषद सदस्य गुत्तेदार भ्रष्ट अधिकारी यांच्यावर मोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे पत्र आज मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री बीड जिल्हा आयुक्त औरंगाबाद विभाग यांना जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मार्फत निवेदने पाठवण्यात आली जर यावरती योग्य ती कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये आयुक्तालय औरंगाबाद व मुंबई आझाद मैदान या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल याची सर्वस्व जबाबदारी ही सर्व आपल्या कार्यालयाचे असेल पत्र देऊन या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष रामधन जमले, सचिव प्रा. ज्ञानेश्वर राऊत संघटन मंत्री सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबागणेशकर जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती कैलासच पालीवाल, कोषाध्यक्ष रामभाऊ शेरकर, मीडिया प्रमुख भीमराव कुटे, तालुकाध्यक्ष आजम खान, उपतालुकाध्यक्ष माऊली शिंदे, सर्कल प्रमुख दत्ता सुरवसे, सर्कल प्रमुख देवा गुंजाळ युवा नेते प्रवीण पवार , इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात व सामान्य नागरिक उपस्थित होते