रत्नागिरी : तालुक्यातील कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दि. ११ डिसेंबरला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. फक्त भंडारी समाजातील इयत्ता दहावी परीक्षेत ७५ टक्के, इयत्ता बारावी परीक्षेत ७० टक्के, पदवी, पदविकाधारक तसेच इतर उच्चशिक्षण परीक्षा ६० टक्क्यांवर गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात येणार आहे. बंदररोड येथील कित्तेभंडारी सभागृहात विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेशअर्ज भरणे आवश्यक आहे. सन २०२१ - २०२२ या शैक्षणिक वर्षातील गुणपत्रकाची नक्कल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी आहे. इच्छुकांनी ९२२१४१२९२२ या मोबाईल क्रमांकासह दूरध्वनी क्रमांक ०२३५२ - २२३०२० यावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. फक्त भंडारी समाजातीलच इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदविका, उच्चशिक्षण परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. दि. १५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेशअर्ज स्वीकारले जाणार आहेत. भंडारी समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर तारखेपूर्वी आपले अर्ज संस्थेच्या कार्यालयात मूळ गुणपत्रकाच्या नकलेसोबत पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भंडारी समाजातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं