समुद्र किनारी करण्यात येणाऱ्या व्यवसायामध्ये हमखास यश येत आहे. अलिकडेच या ठिकाणी व्यवसाय उभारण्याचे चांगलेच पेव फुटले आहे. असे व्यवसाय उभे राहताना मुळ मच्छिमार व्यावसायिक मात्र चांगलाच देशोधडीला लागत आहे. अशीच परिस्थिती अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-थेराेंडा खंडेरावपाडा गावात निर्माण झाल्याने मुळ मच्छिमार व्यावसायिक अडचणीत सापडला आहे.
आक्रमक झालेल्या मच्छिमार समाजातील महिलांनी आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर जोरदार धडक दिली.
समुद्र किनारी असणारे मलई क्षेत्रातील जमिन समान वाटप करावी अशी मागणी करणारे निवेदन थेरांडा खंडेरावपाडा ग्रामस्थ मंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले.पर्यटक मोठ्या संख्येने समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन स्थळांना पहिली पसंती देत आहेत.गेल्या काही वर्षात समुद्र किनारी असणारा पर्यटन व्यवसाय चांगलाच तेजीत येत असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या समुद्र किनारी पर्यटकांची सातत्याने गर्दीचा महापूर आलेला असताे. त्यामुळे येथील हाॅटेल, रेस्टारंट, लाॅजींग, काॅटेज, टेंट, मनाेरंजानाची साधने, समुद्र सफर करण्याचे व्यवसाय कायम हाऊसफुल्ल असतात.
अलिबाग तालुक्यातील थेरांडा समुद्र किनारी मच्छिमार व्यावसायिकांचे पारंरपारीक मासळी सुकवण्याचे आटे आहेत. तसेच या ठिकाणी काहींनी पर्यटन उद्याेगाला आपलेसे केले आहे. मात्र पर्यटक व्यावसायिकांमुळे मुळ मच्छिमार उध्वस्थ हाेत आहे, असे मुळ मच्छिमार व्यावसायिक संगीता पाटील यांनी नवराष्ट्र शी बाेलताना सांगितले.
पर्यटन व्यावसायिकांसाठीच समुद्र किनाऱ्यावरीव जमीन दिल्यास आम्ही मासळी काेठे सुकवायची, आमचा उदरनिर्वाह कसा चालणार असा सवाल प्रेमा काेंडे या महिलेने आमच्या प्रतिनिधीशी बाेलताना उपस्थित केला. आम्हाला आमची जमीन सरकारने दिलेले आहे. पर्यटक व्यवसायिकांनाच सरसकट जमीन न देता त्याचे समान वाटप करावे, अशी मागणी आमची समस्थ ग्रामस्थांची आहे. अलिबागचे आमदार मात्र आम्हाला न्याय देत नाहीत ते धनदांडग्यांच्या पाठीशी राहतात असा आराेप ग्रामस्थांनी केला आहे.----दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने थेरांडावासीय अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जमा झाले.
सरसकट जमिनी देण्यास विरोध करणे, जमिनीची माेजणी थांबवणे या प्रमुख मागण्या असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्दशनास आणून दिले.
2021 राेजी तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी येथील बेकायदा पर्यटन उद्याेगांवर बुलडाेझर फिरवला हाेता. त्यांनी कारवाई केल्याने सर्व काही सुरळीत सुरु हाेते. आता मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या.... अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले हाेते.
सदरचे मलई क्षेत्र सुमारे 36 ग्रामस्थांना पर्यटन व्यवसायासाठी भुई भाड्याने देण्याचे प्रयोजन आहे. त्यावरुन रेवदंडा तलाठी यांनी जमीनीच्या माेजणीची मागणी केली हाेती. सदर मागणी अर्जा नुसार 21 आॅक्टाेबर 2022 राेजी मोजणी लावली हाेती. मात्र खंडेराव पाडा आणि बाजारपाडा ग्रामस्थांनी 19 आॅक्टाेूर 2022 रोजीच्या अर्जान्वये हरकत घेतली हाेती.
ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा यानी मलई क्षेत्रै लगतचे गुरचरण क्षेत्र किती आहे. याची माहिती मिळत नाही ताेपर्यंत मलई क्षेत्राची माेजणी करण्यास बरकत घेतल्याने माेजणी स्थगित करण्यात आली.समुद्र किनाऱ्यावरील मलई क्षेत्र खंडेराव पाडा आणि बाजार पाडा गावातील सुमारे 250 मच्छिमार ग्रामस्थांना मच्छी व्यवसायासाठी महाराष्ट्र सरकारने 1983 च्या सरकारी निर्णयानुसार व जमिन महसुल संहिता 1966 चे कलम 22 नुसार समान वाटप करावे. मात्र सदरच्या वाटपा पूर्वी ठराविक ग्रामस्थांना पर्यटन व्यवसायासाठी सदरचे गुरचरण क्षेत्र भुईभाड्याने मंजूर करु नये, तसेच उपअधिक्षक भूमीअभिलेख अलिबाग यांच्या मार्फत जमिनीची माेजणी करण्यास हरकत असल्याचे निवेदनात नमुद केले आहे...
....थेरोंडा ग्रामस्थांचा विषय हा गावकीचा प्रश्न आहे. दोघांची इच्छा असेल तर मी त्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यास तयार आहे. मी काेणाही एका गटाची बाजू घेतलेली नाही. मला दोन्ही सारखेच आहेत. -आमदार महेंद्र दळवी, अलिबाग.......